पुण्यातील चिंचवड येथे टोळक्याने धुडगूस घालत परिसरातील १० ते १५ वाहनांची तोडफोड केली.
पुणे- पुण्यातील चिंचवड येथे टोळक्याने धुडगूस घालत परिसरातील १० ते १५ वाहनांची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चिंचवडमधील मंगलमूर्तीवाडा परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन गटात झालेल्या वादातून ही तोडफोड करण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या घटनेमध्ये रिक्षा, कार, टेम्पो अशा वाहनांची लाकडी दांडके आणि दगडाच्या साहाय्याने ही तोडफोड करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.