महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौंदर्य. यामध्ये हेल्दी त्वचा, मऊ-मुलायम केस, चमकदार डोळे याचा समावेश होतो.
महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौंदर्य. यामध्ये हेल्दी त्वचा, मऊ-मुलायम केस, चमकदार डोळे याचा समावेश होतो. सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी शरीराला अनावश्यक व हानिकारक असणारी महागडी क्रीम लावली जातात व त्वचा खराब करून घेतली जाते.
पण अत्यंत कमी खर्चामध्ये व घरात असणारी एक वस्तू वापरून आपण आपल्या त्वचेला तजेलदारपणा आणू शकतो. आपले केस मऊसूत करू शकतो असं जर तुम्हाला कोणी सागितलं तर? हो, हे खरं आहे . ती गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील ‘नारळ’. विश्वास बसत नाही ना!
नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष म्हणतो ते काही खोटं नाही, कोकणात वाढणा-या नारळाचे बहुगुणी उपयोग आहेत.
नारळाचे पाणी, ओल्या नारळाचा खवलेला कीस, नारळाचे दूध, सुके खोबरे, नारळाचे तेल, नारळाची करवंटी हे सारं सौंदर्यवृद्धीसाठी महत्त्वाचं आहे. त्याचा उपयोग करून अनेक नामांकित तारकाही त्वचा तजेलदार ठेवतात.
त्वचा
पावसाळ्याच्या दिवसात चेहरा चिकचिकीत ऑईली होणे ही खूप मोठी समस्या तरुणींसमोर उभी राहते, त्यावर उपाय म्हणजे नारळाचे पाणी. ते आपण चेह-याला लावून ठेवले तर त्यामुळे त्वचा निर्मळ आणि नितळ राखण्यासाठीही मदत होईल.
ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही ऑग्रेनिक तत्त्व असतात त्यामुळे त्वचेला त्याचा फायदा होतो. निस्तेज व कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळुवार हाताने मसाज करावा, त्वचा ग्लो करेल.
नारळाचे पाणी व दूध त्वचेच्या क्लििझगसाठीही उपयुक्त ठरतात . कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते तेव्हा नियमित नारळाच्या दुधाने चेह-याला मसाज केल्यास त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत दिसायला लागते.
गर्भधारणेनंतर
नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवडयातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाचा रंग उजळतो. शिवाय टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे.
केस
पावसाळ्यामध्ये केस धुणे म्हणजे एक मोठा प्रश्न असतो. केसासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळावे. यामुळे केस मुलायम होतातच, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसांची वाढ होते.
वजन घटण्यास उपयुक्त
नारळाच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट्स असले तरी हे फॅट्स मीडियम चिल्ड फॅटी अॅसिड असतात. यामुळे हे फॅट्स शरीरात चरबीप्रमाणे साचत नाहीत.त्याचबरोबर नारळाच्या दुधामुळे बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.