कान्स चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटवर आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणारी दिपीका पादुकोन ‘हॉटेस्ट वुमन ऑफ दि इयर’ ठरली आहे.
मुंबई- कान्स चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटवर आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणारी दिपीका पादुकोन ‘हॉटेस्ट वुमन ऑफ दि इयर’ ठरली आहे. फॅशन मॅगजीन मॅक्सीम मध्ये २०१६ मध्ये प्रियांका चोप्राला ‘हॉटेस्ट वुमन ऑफ दि इयर’ घोषित करण्यात आले होते. यावर्षी मात्र दिपीकाने प्रियांकाला मागे टाकले आहे.
दरम्यान दिपीकासह प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, परिणीती चोप्रा आणि सोनम कपूर यांनी फॅशन मॅगजीन मॅक्सीमच्या २०१७ मधील टॉप १०० हॉट वुमेनच्या यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.
दिपीकासह अनुष्का शर्मा, परिणीती चोप्रा आणि सोनम कपूर यांनी सोशल मीडियावर मॅक्सिम साप्ताहिकाच्या मुखपृष्ठाचा फोटो शेअर केला आहे.
‘ट्रिपल एक्स : जेंडर केज’या चित्रपटातून दिपीकाने हॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर दिपीकाचा जलवा पहायला मिळाला. फोर्ब्सने जाहीर केलेल्या २०१६च्या सर्वाधिक मानधन घेणा-या टॉप १० अभिनेत्रींमध्येही दिपीकाचा समावेश आहे.