देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणुकीच्या शनिवारी शेवटच्या दिवशी ४९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
देवगड- देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणुकीच्या शनिवारी शेवटच्या दिवशी ४९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
नगर पंचायतीच्या एकूण १७ जागांसाठी एकूण ७६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपासह शिवसेनेलाही बंडखोरीचा फटका बसला असून; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बंडखोरांचे मनपरिवर्तनासाठी राजकीय पक्षांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
देवगड-जामसंडे नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक-१ मधून काँग्रेसचे संजय गणपत तारकर, प्रभाग-२ मधून करुणा काशीनाथ वराडकर, प्रभाग क्रमांक-३मधून विशाखा विनोद पेडणेकर, प्रभाग-४ मधून अरुण शिवराम भडसाळे, प्रभाग-५ मधून प्रकाश गणपत जाधव, प्रभाग-६ मधून योगेश प्रकाश चांदोसकर, प्रभाग-७ मधून उमेश भास्कर कणेरकर, प्रभाग-८ मधून विकास प्रकाश कोयंडे, प्रभाग-९ मधून प्रणाली मिलिंद माने, प्रभाग-१०मधून श्रृती श्रीकृष्ण जाधव, प्रभाग-११मधून स्मिता स्वप्नील पारकर, प्रभाग-१२ मधून प्रियांका प्रदीप साळसकर, प्रभाग-१३ मधून उष:कला उदयराज केळूसकर, प्रभाग-१४ मधून अश्विनी सुरेंद्र लांबोरे, प्रभाग-१५मधून संजय धाकू पेडणेकर, प्रभाग-१६ मधून उज्ज्वला गणेश अदम, प्रभाग-१७मधून बापू शांताराम जुवाटकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, काँग्रेसमधून उमेदवारी न मिळाल्याने प्रभाग-८ मधून विश्वमित्र खडपकर, प्रभाग-१७मधून ज्ञानेश्वर खवळे यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.