देवगड येथील गार्मेट युनिट देवगडच्या विकासाचे पुढचे पाऊल ठरेल, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
देवगड- देवगड येथील गार्मेट युनिट देवगडच्या विकासाचे पुढचे पाऊल ठरेल, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. देवगड तालुका महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित गार्मेट उद्योग प्रशिक्षणाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शनिवारी झाले.
देवगड इंद्रप्रस्थ हॉल इथे देवगड तालुका महिला काँग्रेसच्या वतीने गार्मेट प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासह महिला तालुकाध्यक्ष प्रियांका साळसकर, तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, अॅड. अविनाश माणगावकर, प्रणाली माने, सभापती रवींद्र जोगल, उपसभापती दीप्ती घाडी, रंजना कदम, प्रभावती गोसावी, योगेश चांदोस्कर उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा लाभ सुमारे अडीचशे महिलांनी घेतला.
देवगड तालुका मागास राहणार नाही. तालुक्याच्या नावापुढे असणारा ‘मागास’ हा शिक्का मी पुसेन, असे मी निवडणूक प्रचाराच्या वेळी म्हणालो होतो, याची सुरुवात या गार्मेट प्रशिक्षणाने होत आहे. हे गार्मेटचे युनिट देवगडच्या विकासाचे पुढच पाऊल ठरेल, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.