भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग बाबा झाला. त्याच्या घरी एका नन्ह्या परिचे आगमन झाले आहे.
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगच्या घरी नन्ही परिचे आगमन झाले आहे. अभिनेत्री गीता बसराने २७ जुलैला लंडनमध्ये कन्येला जन्म दिला.
हरभजन सिंहची आई अवतार कौरने एका वेबसाईटला ही माहिती दिली. फोनवरुन हरभजन आणि गीताला शुभेच्छा दिल्याचे त्याच्या आईने सांगितले.
हरभजन सिंह आणि अभिनेत्री गीता बसरा मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते. भज्जी पंजाब पोलीस विभागात एसपी पदावर आहे.