जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन वारंवार सुरूच असून सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे तीन रेंजर्स ठार झाले.
जम्मू- जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन वारंवार सुरूच असून सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे तीन रेंजर्स ठार झाले.
शनिवारी सकाळी राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथे सीमेपलीकडून उखळी तोफांचा मारा करण्यात आला. पाक रेंजर्सनी भारताच्या देवरा गावातील लोकवस्तीवर तोफगोळे डागले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास पाक रेंजर्सनी गोळीबार सुरू केला व त्यास बीएसएफ जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
जवानाच्या कानाजवळ गोळी लागल्याने यामध्ये एक जवान गंभीर जखमी झाला आहे. भारतानेही प्रत्युत्तराची तीव्रता वाढवून तोफा व गोळीबारानेच पाकच्या दिशेने मारा केला. यामध्ये तीन रेंजर्स ठार झाले.