कोकण रेल्वे मार्गावर सहा विंटर स्पेशलच्या ९६ फेऱ्यांची घोषणा शनिवारी करण्यात आली.
रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावर सहा विंटर स्पेशलच्या ९६ फे-यांची घोषणा शनिवारी करण्यात आली. हिवाळी हंगामात कोकणात येणा-या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने कोकण रेल्वेकडून या गाडयांची घोषणा करण्यात आली आहे. यातील काही गाडय़ा १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.
हिवाळ्यातील पर्यटन हंगाम लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर लो. टिळक टर्मिनस करमाळी मार्गावर विशेष गाडयांच्या १० फे-या चालवण्यात येणार आहेत. लो. टिळक टर्मिनस करमाळी विशेष गाडी १६ डिसेंबर २०१६ ते १३ जानेवारी २०१७ या कालावधीत चालवण्यात येणार आहे. ही गाडी दर शुक्रवारी रात्री १.१० वाजता मुंबईतून सुटेल आणि करमाळीला सकाळी ११.३० वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी १६ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत दर शुक्रवारी दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि रात्री ११.१५ वाजता लो. टिकळ टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ तसेच थिविम स्थानकांवर थांबेल.
मार्गावर १७ डिसेंबर ते १४ जानेवारी २०१७ या कालावधीत आठवडय़ातील शनिवार, रविवार, मंगळवार तसेच बुधवारी धावणार आहे. रात्री १२.२० वाजता ही गाडी मुंबईहून सुटेल आणि करमाळीला सकाळी ११.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी १२.२० वाजता करमाळीहून सुटेल आणि मुंबईला रात्री १०.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ तसेच थिविम
स्थानकावर थांबेल.