लग्नाला जाताना हलकासा का होईना पण मेकअप केला जातो. पण हा मेकअप करताना तो नवरीपेक्षा जरा कमी असला पाहिजे. खरं म्हणजे तो अधिकाधिक नैसर्गिक असणं आवश्यक आहे. नैसर्गिक लुकसाठी पुढे काही टिप्स दिल्या आहेत.
» हेवी ड्रेस आणि साडीसाठी लाईट आणि वॉटरप्रूफ मेकअप करा.
» तुमच्या त्वचेला साजेसं असं फाऊंडेशन लावा.
» गालावर जरा गडद रंगाचा आयश्ॉडो लावा.
» ब्लशरमध्ये पिंक शेड घेऊन चेह-यावर लावा.
डोळ्यांचा मेकअप
» पीच किंवा लाईट रंगाचा आयश्ॉडो आणि ब्लशचा वापर करा.
» पापण्यांवर मोठय़ा आकारात आयलायनर लावा. आयलायनरचा रंग ब्लॅक किंवा ब्राऊन ठेवा.
» गडद रंगाच्या आयश्ॉडोचा वापर करू नका. आयब्रो अगदी बारीक करू नका. त्यामुळे चेह-याची कोमलता खराब होते. तसंच वयही समजायला लागतं.
ओठांचा मेकअप
» नैसर्गिक लुकसाठी मरून रंगाची लिपस्टिक लावावी.
» लिपस्टिक डार्क रंगाची असेल तर लक्षात ठेवा की ती शायनिंगवाली म्हणजेच चमकणारी नसावी.