दागिने हा महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. सोन्याचे दागिने जरी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्याजोगे नसले तरी सोन्याच्या दागिन्यांमध्येही आता बरेच प्रकार आले आहेत. कुंदन-हिरे-मोती यांचा वापर करून हे दागिने घडवलेले पाहायला मिळतात.
सध्या पारंपरिक नाजूक दागिन्यांपेक्षा मोगल काळातले दागिने सध्या महिलांना भुरळ घालत आहेत. हे दागिने २२ कॅरेट सोन्यात विविध पोत आणि फिनिशेसमध्ये घडवले जातात. अत्यंत तेजस्वी सोन्याचा मुलामा असलेले हे कलेक्शन भारतीय परंपरेच्या कला आणि वास्तुरचनेवर आधारित आहे.
या कलेक्शनमध्ये चकाकणारे सफेद पारस आणि सेमी-प्रेशिअस माणिक, गोमेद आणि दक्षिणेच्या समुद्रातील आणि केशी मोती, त्याचप्रमाणे जेडसारखे खडे जडविण्यात आलेले राजेशाही हार, चोकर्स, कानातले आणि कडी आहेत.
यापैकी प्रत्येक दागिना घडवताना निसर्गातील विविध घटक, भारतातील राजेशाही घराणी आणि टक्कर, कुंदन, नक्षी, फ्लिगिरी आणि चित्रायी कारीगरी यासारख्या पारंपरिक शैलीपासून प्रेरणा घेण्यात आली आहे.
या ब्रँडच्या अंतर्गत लग्नसोहळ्यासाठी लागणारे वजनाने जड आणि हलक्या अशा दोन्ही प्रकारचे दागिने समकालीन शैलीत सादर करण्यात आले आहेत. या संग्रहात इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घालण्यात आली आहे.
डिझाईनबद्दल असलेले प्रेम आणि प्रामाणिक भावनेतून या संग्रहातील प्रत्येक दागिना घडविण्यात आला आहे. प्रत्येक वधूला अशा वैभवाने सजण्याचा आणि नाजूकपणाची छाप पाडण्याचा मनोरथ पूर्ण करण्यासाठी परिधान करता येईल, असा हा संग्रह मनुभाई ज्वेलर्समध्ये उपलब्ध आहे.