मुंब्रा महामार्गावरील रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कार्यकर्त्यांच्या फौजफाटय़ासह पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर सोमवारी धडकले.
पनवेल- मुंब्रा महामार्गावरील रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कार्यकर्त्यांच्या फौजफाटय़ासह पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर सोमवारी धडकले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध केला .
मुंब्रा या मार्गाच्या दुरवस्थेमुळे आजवर अनेकांना अपघातांना सामोरे जावे लागले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार करून देखील काहीच उपयोग होत नसल्याने या आव्हाडांनी पनवेल येथील कार्यालयावर धडक दिली. यावेळी राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पीडब्लूडी हाय हाय अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. वारंवार होणा-या अपघातामुळे हा रस्त्या अखत्यारित येत असलेल्या कार्यकारी अभियंता पनवेल यांच्या भिंगारी येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
तात्पुरती दुरुस्ती करून सार्वजनिक बांधकाम खाते मलमपट्टी लावत असल्याचा आरोप यावेळी आव्हाडांनी केला. सहा किलोमीटर लांबीच्या या मार्गावर तत्काळ उपाययोजना राबवून लवकरात लवकर रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी यावेळी आव्हाड यांनी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी मोरे यांच्याकडे केली. यावेळी पंधरा दिवसांत रस्ता दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी माघारी वळले.
[EPSB]
हागणदारीमुक्त योजना वादाच्या भोव-यात
राज्यातील गावे हागणदारीमुक्त व्हावीत यासाठी सरकारने मोहीम आखली आहे
[/EPSB]