पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नवज्योत सिंग सिंद्धू यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदमध्ये बोलतांना आप आणि अकाली दलावर निशाणा साधला.
चंदिगड- पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नवज्योत सिंग सिद्धू प्रचंड मतांनी विजयी झाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली असून यामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना दिलेले वचन पूर्ण केल्याचे सांगितले.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे बहुतांश कल हाती आले आहेत. काँग्रेसला पंजाबमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पंजाबमधील ११७ जागांसाठी मतदान झाले आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदमध्ये बोलतांना म्हणाले की, पंजाबच्या जनतेचा काँग्रेसवर विश्वास होता आणि त्या विश्वासाचा विजय झाला आहे. तसेच आप आणि अकाली दलाला लक्ष करत त्यांनी ‘पंजाबच्या जनतेने दुष्टांचे गर्वहरण करून धर्माला विजयी केल्याचे म्हटले.