अमेरिकेतील एका नाईटक्लबवर एकाने अचानक गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर १४ जण जखमी असून काहीजण गंभीर जखमी झाले आहे.
न्यूयॉर्क- अमेरिकेतील एका नाईटक्लबवर एकाने अचानक गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर १४ जण जखमी असून काहीजण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस करत असून अद्यापही कोणाला अटक झालेली नाही.
अमेरिकेतल्या ओहायो येथील सिनसिनाटीमधल्या पूर्वेकडच्या कॅमिओ क्लबमध्ये ही घटना घडली आहे. या हल्ल्याबाबत अद्यापही कोणतिही माहिती मिळालेली नाही. एक किंवा दोन हल्लेखोर असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या हल्ल्यात जखमी झालेला नागरिकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वर्षभरापूर्वीच फ्लोरिडाच्या ओरलँडोमधील नाइटक्लबवरही अशाच प्रकारचा गोळीबार करण्यात आला होता. त्या गोळीबारात ४९ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच ५३ लोक जखमी होते.