आता नोकरी बदलताच पीएफ खाते आपोआप ट्रान्सफर होणार आहे, अशी माहिती मुख्य भविष्य निर्वाह निधी आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी ही माहिती दिली.
नवी दिल्ली- नोकरी बदलली की कर्मचा-यांना भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ नव्या कंपनीत फिरवण्याची डोकेदुखी वाढते. पण आता नोकरी बदलताच पीएफ खाते आपोआप ट्रान्सफर होणार आहे, अशी माहिती मुख्य भविष्य निर्वाह निधी आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी ही माहिती दिली.
पीएफ सुविधा कर्मचा-यांसाठी अधिक सोयीस्कर होण्यासाठी नवे बदल केले जातात. एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन सध्या पीएफ खाते मध्येच बंद होण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. या समस्येवर तोडगा काढण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत.
कर्मचा-यांची नोकरी बदलली की पीएफ खाते बंद होऊन नवीन कंपनीत नव्याने खाते सुरू करावे लागते. पण आता आधारकार्ड सक्तीचे केल्याने खाते बंद होणार नाही. आता जर कोणी नोकरी बदलली तर अर्जाशिवायच त्याचे पीएफ खात्यातले पैसे तीन दिवसांत ट्रान्सफर होतील.
जर कर्मचा-याकडे आधार आयडी आणि वेरिफाइड आयडी असेल तर तो देशात कुठेही नोकरीसाठी गेला तरी त्याचे पीएफ खाते ट्रान्सफर होईल. ही सुविधा लवकरच सुरू होईल, असे जॉय यांनी सांगितले.