नारायण राणे हे लवकरच एनडीएत सामील होतील आणि राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांचा योग्य सन्मानही होईल, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
शिर्डी– नारायण राणे हे लवकरच एनडीएत सामील होतील आणि राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांचा योग्य सन्मानही होईल, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. शिर्डी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नारायण राणेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला.
राणे लवकरच एनडीएत सामील होतील. तसेच ते एनडीएमध्ये आल्याने आमची ताकद आणखी वाढेल, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. यावेळी बोलताना आठवले म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात राणे हे चांगल्या खात्याचे मंत्री असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
[EPSB]
[/EPSB]