बिनधास्त आणि बेधडक व्यक्तिमत्त्व असलेले खासदार उदयन राजे यांनी अनेकदा आपल्या राष्ट्रवादी पक्षाविरोधात वक्तव्य केलेले आहे. मात्र आज चक्क त्यांनी शरद पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले.
सातारा- बिनधास्त आणि बेधडक व्यक्तिमत्त्व असलेले खासदार उदयन राजे यांनी अनेकदा आपल्या राष्ट्रवादी पक्षाविरोधात वक्तव्य केलेले आहे. मात्र आज चक्क त्यांनी शरद पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले. या प्रवासात काय काय गप्पा झाल्या हेही उदयन राजे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
उदयनराजे भोसले आणि शरद पवार यांनी पुणे ते सातारा हा प्रवास एकाच गाडीतून केला. या प्रवासादरम्यान काय काय गप्पा झाल्या, याबाबतची माहिती स्वत: उदयनराजेंनी पत्रकारांना दिली. साता-यात पोहोचल्यानंतर, उदयनराजेंनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी उदयनराजेंनी गाडीतील गप्पांबाबतची माहिती दिली. उदयनराजे म्हणाले, आमची पवारसाहेबांच्या गाडीबद्दल चर्चा सुरू होती.
पवार साहेबांची पूर्वीची लँड क्रूझर गाडी भारी होती. सध्याची गाडी तितकीशी कम्फर्टेबल नाही. मात्र त्यांच्या गाडीचा नंबर तोच आहे, तीन ति-या, अर्थात ३३३ आणि आपल्या गाडीचा सत्ता (७) दोन्हीही भारी आहे. मी त्यांना विचारले तीन ति-यां का, पण ते म्हणाले, कायम माहीत नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांकडे तक्रारी केल्याचे सांगण्यात येते, त्याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले, कोणी कुणाची तक्रार केली हे आपल्याला माहीत नाही.
ज्यांनी केली असेल त्यांना विचारा, पवारसाहेबांनी मला विचारले असते, तर मी सांगितले असते. आपण स्टाईलमध्ये जगतो, आपण इंटरनॅशनल लेव्हलची माणसे आहोत, हायटेक गोष्टी करतो, याने तक्रार केली, त्याने तक्रार केली, याकडे लक्ष देत नाही.दरम्यान उदयनराजेंनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले. लोकशाहीत सर्वाना बोलण्याचा अधिकार आहे, याचा अर्थ कोणी पण उत्पात केला तर मी सहन करून घेणार नाही. गप्प आहे, तोवर ग्प्प आहे, असे उदयनराजे म्हणाले.
[EPSB]
[/EPSB]