श्रावण सुरू झालाय.. श्रावण म्हणजे सणवारांची रेलचेल. मध्येच ऊन तर मध्येच पाऊस.. म्हणजे नाही म्हटलं तरी घामाला सामोरं जावं लागतंच. अशा या वातावरणात मेकअप कसा करावा याची माहिती ओरिफ्लेमच्या प्रसिद्ध ब्युटी आणि मेकअप तज्ज्ञ आकृती कोचर आपल्याला देत आहेत.
» पावसाळ्यात शिमरऐवजी मॅट ब्रॉन्झर वापरावा. शिमरचा समावेश असणारं मेकअप उत्पादन वापरू नका. त्याऐवजी सन किस्ड लूक (आयशॅडोच्या न्यूट्रल टोन्स, गाल आणि ओठ), पीच टोन्स वापरा ज्यातून निरोगी त्वचा अधिक उठावदार बनते.
» लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना आउटलाईन करा. अशाने आद्र्रतेमुळे लिपस्टिक पसरण्यास अवरोध होतो. लिपस्टिक लावून झाल्यानंतर त्यावर ग्लॉस लावण्यापेक्षा क्रिमी लिपस्टिक लावावी, जी पोषणही पुरवते. पावसाळ्यात स्टिक लिप ग्लॉसेस वापरणं त्रासदायक अनुभव ठरू शकतो.
» आयशॅडोचा बेस म्हणून कन्सिलरनंतर लूज पावडर/कॉम्पॅक्ट लावावं. यामुळे तुमची आयशॅडो जास्त वेळ टिकून राहील आणि ती सुरकुतल्यासारखीही दिसणार नाही. शक्यतो लाईट वेट फाउंडेशन लावावं. बीबी किंवा सीसी क्रीम लावल्यास उत्तम. कारण ते ऑल इन वन असतात किंवा तुमच्या नेहमीच्या फाउंडेशनचा पातळ थर लावावा.
» चेह-यावरचे छोटे डाग लपवायचे असल्यास कन्सिलरच उत्तम. कन्सिलर नीट बसण्यासाठी त्यावर कॉम्पॅक्ट लावायला विसरू नका. यामुळे तुम्ही चेह-याला लावलेलं फाउंडेशन निघत नाही. तुम्हाला कन्सिलर/फाउंडेशन दररोज नको असल्यास, लाईट वेट फिनिशपेक्षा कॉम्पॅक्ट वापरणं उत्तम ठरेल.
» क्लेन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायिझगनंतर, चेह-याला मेकअप लावण्यापूर्वी प्रायमर लावायला विसरू नका. अशाने मेकअप दीर्घकाळ टिकतो. हा प्रायमर मॅट फिनिशमधला असावा आणि त्यामुळे तुमची त्वचा तेलकट दिसता कामा नये. (संदर्भ : द वन फेस परफेक्टिंग प्रायमर) तुम्ही बीबी किंवा सीसी क्रीम लावत असल्यास प्रायमर लावला नाही तरी चालेल.
» मेकअप कमीत कमी, पण तुम्हाला ग्लॅमरस लूक देणारा हवा असल्यास ओठांना ठळक बनवा. चेहरा उजळ बनवण्यासाठी उजळ रंगाची लिपस्टिक लावावी. त्याखेरीज चेह-यावर दुसरा रंग लावणं टाळा.
» डोळे ग्लॅमरस बनवण्यासाठी त्यांना वन लॅश रेझिस्टन्स मस्कारा लावा. हा मस्कारा म्हणजे तुमच्या पापण्यांना कोणती हानी पोहोचू नये यासाठीची एक ट्रिटमेण्टच असते. त्याचबरोबर हा मस्कारा तुमच्या पापण्यांना भरगच्च आणि वळणदारही बनवतो.
» भरपूर मस्कारा लावला असल्यास चेह-याला दुसरा रंग लावणं टाळा. यामुळे तुमचे डोळे उठावदार आणि टपोरे दिसतात.
» वॉटरप्रूफ आयलायनर लावावं जेणेकरून आद्र्रतेमुळे ते पसरणार नाही. वॉटरप्रूफ वन जेल आयलायनर पेन्सिल वापरावी. ही गडद काळ्या रंगाची असून पसरत नाही. विशेषत: पावसाळ्यात पावडर ब्लश लावावा. पावडर आयशॅडो लावावी. पावडर मेकअपला सुरकुत्या पडत नाहीत आणि तो दीर्घकाळ टिकतो.
» रात्री झोपण्यापूर्वी चांगल्या क्लिन्झर रिमूव्हरने चेहरा स्वच्छ करावा. अशाने तुमच्या त्वचेवर कोणताही संसर्ग राहणार नाही. पावसाळ्यात त्वचेवरची छिद्रं सहजपणे बंद होतात. त्यामुळे प्रत्येक सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे तुमची त्वचा मोकळेपणाने श्वास घेईल.