गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.. सिंधुदुर्ग राजाचा विजय असो.. च्या जयघोषात, ढोलताशांचा गजर डिजेचा ताल.. अबीर गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गुरुवारी सिंधुदुर्ग राजाचे थाटात विसर्जन पावशी तलावात करण्यात आले.
कुडाळ- गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.. सिंधुदुर्ग राजाचा विजय असो.. च्या जयघोषात, ढोलताशांचा गजर डिजेचा ताल.. अबीर गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गुरुवारी सिंधुदुर्ग राजाचे थाटात विसर्जन पावशी तलावात करण्यात आले.
या विसर्जन मिरवणुकीत माजी खासदार निलेश राणे सहभागी झाले होते. या मिरवणुकी दरम्यान गणेश भक्तांनी सिंधुदुर्ग राजाचे ठिकठिकाणी दर्शन घेतले. गेले अकरा दिवस येथील काँग्रेस कार्यालयाच्या आवारात प्रतिवर्षाप्रमाणे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
माजी खास. डॉ. निलेश राणे यांच्या संकल्पनेतून या सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यामुळे कुडाळमध्ये घरगुती गणपतींसह या सार्वजनिक गणपतीमुळे भक्तिमय वातावरण होते.
अनंत चतुर्थीच्या दिवशी राजाला भक्तिपूर्ण व भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीला माजी खास. निलेश राणे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्याच हस्ते महाआरती झाली आणि सिंधुदुर्ग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.