भारतीय जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर चौफेर टीका होत असताना त्यांनी या टिकेला उत्तर देतांना विचित्र प्रतिक्रीया दिली आहे.
नवी दिल्ली- भारतीय जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर चौफेर टीका होत असताना त्यांनी या टिकेला उत्तर देतांना विचित्र प्रतिक्रीया दिली आहे. मी भाजपासाठी आयर्टम गर्ल आहे, असे बेताल वक्तव्य करत त्यांनी महिला वर्गाचा अपमान केला आहे.
रामपूरमधील एका कार्यक्रमात आझम खान यांनी भारतीय जवानांना ‘बलात्कारी’ संबोधले होते. त्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. या विधानावर सारवासारव करतांना त्यांनी म्हटले आहे की, ‘माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. मी जवानांवर असे आरोप केलेले नाही.’
भाजपानेही या विधानावरून आझम खान यांना लक्ष्य केले. त्यावर उत्तर देतांना म्हटले की, ‘मला भाजपाने आयटम गर्ल बनवून टाकले आहे. भाजपाकडे टीका करण्यासाठी दुसरी कोणतीही व्यक्ती नाही. माझ्यावर टीका करून भाजपाने अनेक निवडणुका लढवल्या आहेत.’
आझम खान यांनी अशा प्रकराची वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी अनेक मुद्द्यावरून वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.