शरणागतीसाठी मुदत वाढवण्यासाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला बंगळुरूमध्ये शरण येण्याची शक्यता आहे.
चेन्नई- अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला बंगळुरूमध्ये शरण येण्याची शक्यता आहे. शशिकला यांनी शरणागतीसाठी मुदत वाढवण्यासाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
शशिकला यांना ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच १० कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शशिकला यांच्यासह अन्य दोन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने दोषी मानले आहे.
शशिकला यांनी चेन्नई जवळच्या कोव्वट्टूरमधील गोल्डन बे रिसॉर्टमधून पोस गार्डन या निवासस्थानी गेल्या. शशिकला यांच्या घराच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.