बटाटे शिजवत असताना कुकरचा अचानक स्फोट झाल्याने वडापाव विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.
नाशिक- बटाटे शिजवत असताना कुकरचा अचानक स्फोट झाल्याने वडापाव विक्रेत्याचा मृत्यू झाला. ही घटना नाशिकमधील जेलरोड परिसरातील अयोध्यानगर येथे घडली.
अशोक पाटील (४५) असे मृत्यू झालेल्या वडापाव विक्रेत्याचे नाव आहे.
अशोक पाटील यांनी कुकरमध्ये बटाटे शिजवायला लावले होते. पण बराच वेळ झाला तरी कुकरची शिटी होत नव्हती. त्यामुळे ते कुकरजवळ गेले असता त्याचवेळी कुकरचे झाकण जोरात उडाले आणि पाटील यांच्या अंगावर पडले.
यामध्ये पाटील गंभार जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.