‘छत्रपतींचा आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ’ अशी जाहिरातबाजी विधानसभेच्या निवडणुकीत करून भाजपाचे सरकार सत्तेवर आले
मुंबई – ‘छत्रपतींचा आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ’ अशी जाहिरातबाजी विधानसभेच्या निवडणुकीत करून भाजपाचे सरकार सत्तेवर आले. शिवसेना-भाजपाचे सदस्य विधान भवनात प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले होते.
नव्या सरकारच्या स्थापनेनंतर राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वीही सत्ताधारी सदस्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या होत्या. गेल्या वर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशीही शिवसेना-भाजपाच्या सदस्यांनी विधान भवनाच्या आवारात शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला अभिवादन केले होते. मात्र एका वर्षात सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांना छत्रपतींचा विसर पडला असून बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताना ना छपतींच्या नावाचा जयघोष झाला ना त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले गेले. एक वर्षात या सरकारला छत्रपतींचा विसर पडल्याची प्रतिक्रिया विधान भवन परिसरात उमटत होती.