मुंबई, ठाणे शहरात म्हाडातर्फे एसआरए योजनेंतर्गत बांधलेल्या सदनिकांच्या देखभालीची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
मुंबई – मुंबई, ठाणे शहरात म्हाडातर्फे एसआरए योजनेंतर्गत बांधलेल्या सदनिकांच्या देखभालीची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
अॅड. निरंजन डावखरे यांच्या एसआरए लाभधारकांना सदनिका देखभालीच्या २० हजारांच्या रकमेत वाढ करण्याबाबतच्या तारांकित प्रश्नावर बोलताना मंत्री वायकर म्हणाले, एसआरए योजनेतील प्रत्येक सदनिकाधारकास विकासकाकडून २० हजाराची रक्कम सदनिकांच्या देखभालीसाठी देण्यात येते. वाढलेली महागाई आणि सदनिकाधारकांवरील वाढता करांचा बोजा पाहता, या रकमेत वाढ करण्याची मागणी सातत्याने होत आहे. तसा प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून नगरविकास विभागाला पाठवण्यात आला आहे, अशी माहिती वायकर यांनी दिली.