जागतिक साहित्यातील प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार यंदा ऑस्ट्रेलियन लेखक रिचर्ड फ्लानगन यांना जाहीर झाला आहे. ‘द नॅरो रोड टू डिप नॉर्थ’ या पुस्तकाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
लंडन – जागतिक साहित्यातील प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार यंदा ऑस्ट्रेलियन लेखक रिचर्ड फ्लानगन यांना जाहीर झाला आहे. ‘ या पुस्तकाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
द डचेस ऑफ कॉर्नवॉल यांच्या हस्ते ५३ वर्षीय फ्लानगन यांना मंगळवारी रात्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह व ५० हजार पौंडचा असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
दुस-या महायुद्धात बर्मा-थायलंडमध्ये रेल्वे उभारणीचे काम सुरू होते. हा मार्ग उभारताना जवळपास १४ हजार जणांचा मृत्यू झाला होता. लेखकाचे वडिल आर्ची फ्लानमन हे साडे तीन वर्षे बर्मामध्ये राहत होते. याच अनुभवाची गुंफण या कादंबरीत करण्यात आली आहे. या कादंबरीची प्रेरणा आपल्या वडिलांपासून मिळाल्याचे फ्लानगन यांनी सांगितले. त्यांनी हे पुस्तक वडिल आर्ची फ्लानगन यांना समर्पित केले आहे.
या पुरस्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना फ्लानगन म्हणाले की, जागतिक साहित्यातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी आनंदित झालो आहे. खरं तर मला हा पुरस्कार मिळण्याची अपेक्षा नव्हती. हे पुस्तक लिहायला जवळपास १२ वर्षे लागली आहेत. वडिलांच्या निधनापूर्वीच हे पुस्तक हातावेगळे करण्याचे आपण ठरवले होते.