काही दिवसांपूर्वीच साहिल सांघाशी विवाहबंधनात अडकलेली बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा कामांमध्ये इतकी व्यस्त झाली आहे ती म्हणते की व्यस्त वेळापत्रकामुळे तिच्याकडे हनिमूनसाठीही वेळ नाही.
नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वीच साहिल सांघाशी विवाहबंधनात अडकलेली बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा कामांमध्ये इतकी व्यस्त झाली आहे ती म्हणते की व्यस्त वेळापत्रकामुळे तिच्याकडे हनिमूनसाठीही वेळ नाही.
सध्या साहिल आणि मी आम्ही दोघेही कामांमध्ये व्यस्त आहोत. आम्ही हनिमूनबाबत प्लॅन केला आहे. मात्र सध्या हे शक्य नाही. त्यामुळे सुट्टीबाबत मी अद्याप विचार केलेला नाही. आम्ही दोघेही आमचे काम एन्जॉय करत आहोत असे दिया म्हणाली.
तसेच नुकतेच आमचे लग्न झाल्याने हे क्षण माझ्यासाठी खरंच सुंदर आहेत. मी ते एन्जॉय करत आहे. मात्र लग्नामुळे फार काही बदलले असे मला मात्र वाटत नाही, असे दियाने सांगितले.