कोलंबियामध्ये मुसळधार पावसाने झालेल्या भूसख्लनामुळे ६१ जणांचा मृत्यू झाला तर ३७ जण जखमी झाल्याची माहिती अधि-यांनी दिली.
सलगर- कोलंबियातील सलगर शहरात मुसळधार पावसाने झालेल्या भूसख्लनामुळे ६१ जणांचा मृत्यू झाला तर ३७ जण जखमी झाल्याची माहिती अधि-यांनी दिली.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास नागरिक झोपेत असतांना हे भूसख्लन झाले. मुसळधार पावसामुळे या ठिकाणी चिखलाच्या गाळात अनेक घरे दबली गेली आहेत.
या दुर्घटनेनंतर कोलंबियाचे राष्ट्रपती जुअन मॅन्यूल सेंटोस यांनी सलगर शहराला भेट दिली. “ही एक दुःखद घटना आहे, यामध्ये मरण पावलेल्यांना आपण परत आणू शकणार नाही पण यातून आपल्याला धैर्याने समोरे जावे लागेल. नव्याने भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे”, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सलगर शहरामध्ये युध्दपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील पिडीत कुटुंबियांना सात हजार अमेरिकन डॉलरची तातडीची मदत जाहीर केली आहे.