मुंबई विमानतळावरील प्रतिष्ठेच्या ‘खंबाटा एव्हिएशन कामगार क्रेडिट सोसायटी’च्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘महाराष्ट्र समर्थ कामगार संघटने’ने निर्विवाद वर्चस्व गाजवले.
मुंबई- मुंबई विमानतळावरील प्रतिष्ठेच्या ‘खंबाटा एव्हिएशन कामगार क्रेडिट सोसायटी’च्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘महाराष्ट्र समर्थ कामगार संघटने’ने संस्थापक व काँग्रेस नेते नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ‘एमएसकेएस’चे अध्यक्ष आमदार नितेशजी राणे आणि सरचिटणीस प्रवीण नलावडे यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद वर्चस्व गाजवले.
१२ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या निवडणुकीत ७ पैकी ७ ही जागा जिंकत प्रतिस्पर्धी शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेचा धुव्वा उडवला. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून जल्लोष करण्यात आला.
कामगारांच्या प्रश्नांवर आमदार नितेश राणे यांनी तसेच ‘समर्थ’च्या पदाधिका-यांनी जातीने लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. खंबाटामधील हा प्रचंड विजय कामगारांच्या विश्वासाचीच पोचपावती आहे.
या भव्य विजयात ‘महाराष्ट्र समर्थ कामगार संघटने’चे सरचिटणीस प्रवीण नलावडे, शरद सावंत, जगदीश अमीन कुट्टी, विश्वनाथ दळवी, राजा गावडे, अनिल पाटकर यांनी मोलाची कामगिरी बजावली.