कडाक्याच्या उन्हाळ्यात बक्षिसांचा आल्हाददायक गारवा घेऊन येतेय, झी मराठी वाहिनी. या मे महिन्यात झी मराठी साजरा करत आहे ‘मनोरंजनाचा अधिक मास’ ज्यामध्ये या महिन्यात रविवारीही प्रेक्षकांना आपल्या लाडक्या मालिकांचा आस्वाद घेता येणार आहे.
कडाक्याच्या उन्हाळ्यात बक्षिसांचा आल्हाददायक गारवा घेऊन येतेय, झी मराठी वाहिनी. या मे महिन्यात झी मराठी साजरा करत आहे ‘मनोरंजनाचा अधिक मास’ ज्यामध्ये या महिन्यात रविवारीही प्रेक्षकांना आपल्या लाडक्या मालिकांचा आस्वाद घेता येणार आहे. याशिवाय प्रेक्षकांसाठी एक स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. ज्यात त्यांना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधीही मिळणार आहे.
झी मराठीवरील सर्वच मालिका आणि त्यातील कलाकार घराघरांत लोकप्रिय आहेत. सायंकाळच्या ६.३०च्या ‘होममिनिस्टर’पासून ते रात्री ९ वाजता प्रसारित होणा-या ‘काहे दिया परदेस’पर्यंत सर्वच दैनंदिन मालिका, त्यांचं कथानक, त्यात घडणा-या गोष्टी याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कायमच उत्सुकता असते.
झी मराठीवरील याच लोकप्रिय मालिका या महिन्यात प्रेक्षकांना रविवारीही बघायला मिळतील. येत्या १ मेपासून मनोरंजनाचा हा अधिकमास सुरू होणार असून यासोबतच प्रेक्षकांसाठी एका खास स्पध्रेचे आयोजनही करण्यात आले आहे.
यामध्ये ६.३० ते रात्री ९ दरम्यान प्रसारित होणा-या ‘होममिनिस्टर’, ‘जयमल्हार’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘माझे पती सौभाग्यवती’ आणि ‘काहे दिया परदेस’ या मालिकांमध्ये दर अध्र्या तासाला त्या भागाशी संबंधित एक प्रश्न विचारला जाणार आहे.
या प्रश्नांची उत्तरे १८००१०३५५१९ आणि १८०० १०३ ५५२३ या क्रमांकांवर फ्री मिस्डकॉलद्वारे देता येतील. या प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-या निवडक भाग्यवान विजेत्यांना ९९९९ रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.
याशिवाय रविवारी विचारल्या जाणा-या सर्वच प्रश्नांची योग्य उत्तरे देणा-या निवडक भाग्यवान विजेत्यांना एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांचं बंपर बक्षीस जिंकता येणार आहे. याशिवाय प्रत्येक आठवडयाच्या निवडक भाग्यवान विजेत्यांना झी मराठीच्या कलाकारांना भेटण्याची संधीही मिळणार आहे हे विशेष.