जॅकीदादालाही काय सुचलं कुणास ठाऊक इतक्या फालतू चित्रपटात त्याने आपल्या ‘सोन्या’सारख्या मुलाचा डेब्यू केला तो.. असो…
तुम्हाला ‘हिरोपंती’ आठवतोय का? नाही नाही.. ‘हिरो’ नाही म्हणत! ‘हिरो’ तर जॅकी श्रॉफचा होता. आणि त्याचा मुलगा टायगर श्रॉफचा अलीकडेच डेब्यू झालेला ‘हिरोपंती’ म्हणतोय आम्ही! तुम्हालाच काय आम्हालाही नाही आठवत.. या नावाचा चित्रपट. काय करणार ना? होताच अगदी टुकार चित्रपट. जॅकीदादालाही काय सुचलं कुणास ठाऊक इतक्या फालतू चित्रपटात त्याने आपल्या ‘सोन्या’सारख्या मुलाचा डेब्यू केला तो.. असो. सांगायचा मुद्दा हा की, आपला हाच टायगर श्रॉफ आता आपल्या गुरुजींना एक भेट सादर करणार आहे. हा एक व्हीडियो असेल, ज्यात त्याचे डान्स गुरूही असतील. टायगरने संधी मिळेत तशी जगप्रसिद्ध गायक आणि डान्सर मायकल जॅक्सन प्रति आपली दिवानगी दाखवून दिली आहे. टायगर हा एक चांगला डान्सर आहे. नुकत्याच झालेल्या शिक्षकदिनी त्याच्याशी संवाद साधायला मिळाला, तेव्हा टायगरने आपले आवडते डान्स शिक्षक परेश शिरोडकर असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी मला माझ्या आयुष्यात खूप मोठी भेट दिली आहे, जी मी माझ्या नृत्यातून सादर करू शकतो, असा आदरही त्याने या वेळी व्यक्त केला होता. या शिक्षकदिनानिमित्ताने मी माझा मायकल जॅक्सन व्हीडियो प्रदर्शित करणार आहे. ज्यात परेश सर माझ्यासोबतडान्स करताना दिसतील. ही माझ्याकडून माझ्या शिक्षकांना भेट असेल. याशिवाय मायकल जॅक्सन यांनादेखील हा सलाम असेल, ज्यांना आम्ही दोघंही पसंत करतो, असंही टायगरने सांगितलं. किमान या प्रयत्नात तरी त्याला यश येवो!