गणेशोत्सवाची धूम सर्वत्र सुरू असतानाच ठाण्यातील प्रादेशिक मनोरुणालयातही गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
ठाणे – गणेशोत्सवाची धूम सर्वत्र सुरू असतानाच ठाण्यातील प्रादेशिक मनोरुणालयातही गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांत अनेक मनोरुग्णांनी सहभाग घेऊन त्यांच्यात असलेल्या अंगभूत कलागुणांना वात करून दिला.
महाराष्ट्रासह ठाणे शहरात १० दिवस गणेश उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. अनेक सार्वजनिक मंडळांनी यानिमित्ताने विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, मात्र या सर्वात वेगळा ठरत आहे, तो ठाण्यातील प्रादेशिक मोरुग्णालयात साजरा होत असलेला गणेशोत्सव. प्रादेशिक मनोरुग्णालयात १० दिवसांच्या गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी यानिमित्ताने एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नृत्य, गाणी अशा अनेक स्पर्धामधून अनेक मनोरुग्णांनी सहभागी होऊन आपल्यात असलेले कलागुण सादर केले. यापैकी काही मनोरुग्ण तर चांगले डान्सर आणि काही पट्टीचे गायक होते. चित्रपटांच्या गाण्यांवर अनेकांनी सर्वसामान्य लोकांना लाजवेल, असे असे नृत्य सादर केले. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालायात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्के आहे आणि त्यामुळेच त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठीच अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात, अशी प्रतिक्रिया प्रदेशिक मनोरुग्णालायाचे डिन विलास नलावडे यांनी दिली.