डॉ. रोहिणी गवाणकर लिखित, ‘कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झाशी रेजिमेंट’ या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचे प्रकाशन १७ नोव्हेंबरला ‘पानीपत’कार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
मुंबई– डॉ. रोहिणी गवाणकर लिखित, ‘कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झाशी रेजिमेंट’ या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचे प्रकाशन १७ नोव्हेंबरला ‘पानीपत’कार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. पुणे येथील एस. एम. जोशी फाउंडेशच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणा-या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लीलाताई चितळे भूषवणार आहेत. या पुस्तकाची पहिली आवृत्ती ‘साधना प्रकाशन’च्याच वतीने १९९८मध्ये प्रकाशित करण्यात आली होती.
कॅप्टन लक्ष्मी यांचे जन्मशताब्दी वर्ष २४ ऑक्टोबरला संपले, त्यानिमित्ताने आता या दुस-या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येत आहे. या प्रकाशन सोहळ्याला अगत्यपूर्वक उपस्थित राहावे, असे आवाहन साधना ट्रस्टचे विश्वस्त रा. ग. जाधव, सचिव हेमंत नाईकनवरे व संपादक विनोद शिरसाठ यांनी केले आहे.