मध्य, हार्बर, पश्चिम अशा मार्गावर दुरुस्तीच्या कामानिमित्त रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-कल्याण डाउन जलद मार्गादरम्यान सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत मेगाब्लॉक आहे.
मुंबई – मध्य, हार्बर, पश्चिम अशा मार्गावर दुरुस्तीच्या कामानिमित्त रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-कल्याण डाउन जलद मार्गादरम्यान सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत मेगाब्लॉक आहे.
हार्बर मार्गावर सीएसटी-कुर्ला व वडाळा रोड ते वांद्रा अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० या वेळेत मेगाब्लॉक आहे. यामुळे पनवेल, बेलापूर, वाशी मार्गातील सर्व लोकल सीएसटी व कुर्ला स्थानकांदरम्यान मेन लाइनवर चालवण्यात येतील. पश्चिम मार्गावरील बोरिवली व भाईंदर स्थानकांदरम्यान अप मार्गावर रात्री ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.