तू ही तू हे नामवंत मराठी गायक मंगेश बोरगावकर याने गायलेले अतिशय रोमॅंटिक गाणे आहे. हे गीत मंदार चोळकर व समीर सामंत यांनी शब्दबद्ध केले असून, संगीत युगंधर देखमुख यांनी दिलेले आहे.
तू ही तू हे नामवंत मराठी गायक मंगेश बोरगावकर याने गायलेले अतिशय रोमॅंटिक गाणे आहे. हे गीत मंदार चोळकर व समीर सामंत यांनी शब्दबद्ध केले असून, संगीत युगंधर देखमुख यांनी दिलेले आहे. सहज ओठांवर बसतील असे शब्द आणि सतत गुणगुणावी अशी गोड चाल असलेले हे व्हॅलेंटाईन स्पेशल गाणे आजच्या पिढीला रुचेल, आवडेल अशा पद्धतीने रचण्यात आले आहे.
रोमँटिक गाण्यांकरिता अनुरुप असा मधाळ आवाज लाभलेल्या, अनेक मराठी हिट गाणी नावावर असलेल्या आणि मिर्ची म्युझिक अवॉर्डचा मानकरी असलेल्या मंगेश बोरगावकरने या व्हॅलेंटाईन स्पेशल गाण्याला आपला आवाज दिला आहे.
मंदार चोळकर आणि समीर सामंत या द्वयीने या रोमँटिक गाण्याला शब्दबद्ध केले आहे. मंदारने ‘दुनियादारी’सारख्या सुपरहिट चित्रपटाची आणि ‘होणार सून मी या घरची’सारख्या अतिशय लोकप्रिय मालिकेची गाणी शब्दबद्ध केली आहेत.
समीर सामंत यांनी प्रचंड यशस्वी ठरलेल्या, शंकर महादेवन आणि सचिन पिळगावकर अभिनीत ‘कटय़ार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटाची गाणी लिहिली होती. अनेक बॉलिवूड संगीतकारांसोबत काम केलेला आणि काही मराठी चित्रपटांना संगीत दिलेला तरुण संगीतकार युगंधर देशमुख याने ‘तू ही तू’ची गाणी संगीतबद्ध केली आहेत.