जनतेमध्ये वावरताना देखावा करू नका तर साधेपणाने राहा, असा सल्ला पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना देत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
मुंबई : जनतेमध्ये वावरताना देखावा करू नका तर साधेपणाने राहा, असा सल्ला पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना देत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
पक्षाच्या कार्यकर्ते, पादाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी आयोजित चिंतन मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला आतापासूनच आत्मविश्वासाने लागावे.
जे मेहनती, जनतेत लोकप्रिय आणि ज्यांचे पाय जमिनीवर असतील, अशांना उमेदवारी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तरुणांना आणि नव्या चेह-यांनाही संधी देणाचा आपण विचार करत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. नवे नेतृत्व पुढे यावे यासाठीच नव्या लोकांना संधी देणार असल्याचे संकेत देत सध्याच्या प्रस्थापित नेत्यांना सूचक इशाराही पवार यांनी दिला.