अँड टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो ‘द वॉईस किड्स’ अनोख्या स्टाईलमध्ये होळी सण साजरा करणार आहे. अगदी बॉलिवूड चित्रपटांमधील या सणाच्या उत्साहाप्रमाणे या शोमध्ये शोले स्टाईलमधील ‘होळी स्पेशल’ एपिसोड पाहायला मिळणार आहे. या उत्साहामध्ये अधिक भर म्हणून प्रेक्षकांना परीक्षकांसोबतच सूत्रसंचालक देखील पूर्णत: नवीन रूपात दिसणार आहे.
या सुपरहिट चित्रपटामधील दृश्यांच्या आठवणी जाग्या करत शोचे परीक्षक या सिनेमातील अजरामर व्यक्तिरेखांच्या रूपात दिसणार आहेत. पलक बसंतीच्या वेषात, हिमेश जयच्या वेषात, शान वीरूच्या वेषात दिसणार आहेत आणि आपला लाडका सूत्रसंचालक जय भानुशाली ठाकूरच्या रूपात दिसणार आहे.
यासोबतच आपल्या ठाकूरसोबत रामलाल पण असणार आहे. या उत्साहपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी जयसोबत नितेश देखील असणार आहे. प्रेक्षकसुद्धा ‘द वॉईस इंडिया किड्स’ मधील या संगीतमय होळी स्पेशल कार्यक्रमाचा त्याच उत्साहासह आनंद घेतील.