नवीन प्रस्तावित विद्यापीठ कायद्याच्या प्रारूपावर सोमवारी मुंबई विद्यापीठात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई – नवीन प्रस्तावित विद्यापीठ कायद्याच्या प्रारूपावर सोमवारी मुंबई विद्यापीठात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील दीक्षान्त सभागृहात सकाळी १० वाजल्यापासून या कार्यशाळेला सुरुवात होणार आहे.
या कार्यशाळेला उच्च शिक्षण विभागातील संचालक, सहसंचालक स्तरावरील अधिकारी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिवांसह विद्यापीठातील अधिकारी, विविध प्राधिकरणाचे प्रमुख उपस्थित राहतील.
नवीन विद्यापीठ कायद्याच्या प्रारूपासंदर्भात उच्च शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व विद्यापीठांत कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. राज्यातील विद्यापीठांत सध्या असलेला महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-१९९४ यात धोरणात्मक बदल करून त्यासाठी डॉ. अरुण निगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या समितीच्या नवीन विद्यापीठ कायदा-२०११ या कायद्यावर प्रामुख्याने या कार्यशाळेत चर्चा होणार आहे.
नवीन कायद्यात शैक्षणिक गुणवत्ते संदर्भात विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सूचना आणि मते या कार्यशाळेच्या माध्यमातून उच्च शिक्षण विभागाला सूचविण्यात येतील. राज्य सरकारकडून हा नवीन प्रस्तावित कायदा डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात संमत करण्याची तयारी सुरू आहे.