नारायण राणे यांच्या प्रचाराच्या समारोपाची प्रचार फेरी गुरुवारी सकाळी ९ वाजल्यापासून वांद्रे पूर्व मतदारसंघातील मध्यवर्ती कार्यालयापासून सुरू होणार आहे.
मुंबई – वांद्रे (पूर्व) मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराच्या समारोपाची प्रचार फेरी गुरुवारी सकाळी ९ वाजल्यापासून वांद्रे पूर्व मतदारसंघातील मध्यवर्ती कार्यालयापासून सुरू होणार आहे.
या प्रचार फेरीमध्ये उमेदवार नारायण राणे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी मंत्री नसीम खान, आमदार वर्षा गायकवाड, माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि काँग्रेसचे सर्व नेते सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ४ वाजेपर्यंत ही फेरी होणार आहे. ४ च्या नंतर या फेरीचा समारोप जाहीर सभेत होईल आणि प्रचाराची सांगता होईल.