अन्नपचन, भूक वाढवणा-या औषधांसह खोकला, ताप, सर्दीवरील विविध २६ औषधे अप्रमाणित तसेच निकृष्ट दर्जाची असल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई – अन्नपचन, भूक वाढवणा-या औषधांसह खोकला, ताप, सर्दीवरील विविध २६ औषधे अप्रमाणित तसेच निकृष्ट दर्जाची असल्याचे उघडकीस आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने सप्टेंबरमध्ये राज्यभर मोहीम हाती घेतली होती. आरोग्यास घातक या औषधांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने बंदी घातली आहे. तसेच, वैद्यकीय व्यावसायिक आणि औषध दुकानांतून ती आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या अन्न व औषधे प्रशासनाचे सहआयुक्त पी. आर. उत्तरवार यांनी दिली आहे.
राज्यात फक्त गुणवत्तापूर्ण औषधेच उपलब्ध व्हावीत, यासाठी अन्न व प्रशासन विभागातर्फे तपासणी होते. सप्टेंबरमधील तपासणीत ही २६ औषधे प्रमाणित नसल्याचे उघडकीस आल्याने बंदीचा निर्णय घेण्यात आला. विक्रेत्यांनी त्यांची विक्री करू नये, शिल्लक औषधे निर्मात्यांना परत करावीत. डॉक्टरांनीही याबाबत खबरदारी घ्यावी आणि रुग्णांनीही यापैकी एखादे औषध घेतले असेल, तेथेच परत करावे, असे आवाहनही उत्तरवार यांनी केले आहे.
ही औषधे घेऊ नका…
ओरिफ्लॉक्स २०० (ओरिसन फार्मास्युटिकल), ऑक्सिपॉड २०० (इंडिको रेमेडिज), ऑन्झिम सिरप (इस्कॉन सायन्स), मल्टिव्हिटॅमीन सिरप (लॅबोरेट फार्मास्युटिकल), सीएमडब्ल्यू माउथवॉश (सार बायोटेक), डिव्हस्पॅन पॅन्टोप्रझोल टॅब्लेट (अफिम फार्माल्युशन), मेगामेंटिन सिरप (अफी पॅरेंटल्स), शार्कोफेरॉल (अॅलेम्बिक फार्मास्युटिकल), पेक्सोक्लेव्ह ड्राय सिरप (अंकुर ड्रग अॅण्ड फार्मा), पॅन्झर (कॉसमॉस फार्माकल), पॅन्थोझम (डिजिटल व्हिजन), लॅनमॉक्स (जेएम रेमेडिज), अगमॅक्स डय़ुओ (लाइफ व्हिजन हेल्थकेअर), टोक्सो मॉक्स (सवा मेडिका ), रेबी डी (अल्ट्राटेक फार्मास्युटिकल), रेबीफिन डीएसआर (युनिक्स बायोटेक), मोबिनॅक (ऑस्टिन फार्मास्युटिकल), सिकट्री प्लस (ब्रसिका फार्मास्युटिकल), पॅन्टॅब २० (क्रेसेन्ट थेरिप्युटिक्स), टोपेज (एमजे बायोफॉर्म), अॅमॉक्सिक्लीन अॅण्ड पोटॅशियम (अॅक्सुम ड्रग्ज अॅण्ड फार्मास्युटिकल), प्रोजोल टॅब्लेट (हब फार्मासिटीकल) पेप्सीन सिरप (रिव्हप्रा फॉम्युलेशन), स्वसेरा डी (तौरस)