अभिनेते परेश रावल लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर बनणा-या चित्रपटात मोदींची व्यक्तीरेखा साकारणार आहेत.
वेगवेगळया भूमिका अगदी सहजतेने करण्याची हातोटी असलेले अभिनेते परेश रावल लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर बनणा-या चित्रपटात मोदींची व्यक्तीरेखा साकारणार आहेत.
मोदींची राजकीय व्यक्तीरेखा साकारण्यासाठी माझी झालेली निवड अगदी योग्य आहे असे परेश रावल यांनी म्हटले आहे. मला या चित्रपटाबद्दल विश्वास आहे. माझ्याशिवाय दुसरा कोणीही नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा साकारु शकत नाही. ते एक वेगळे व्यक्तीमत्व आहे.
मला या रोलबद्दल प्रचंड उत्सुक्ता आहे. मी यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही. आम्ही लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहोत असे परेश रावल यांनी सांगितले. नुकत्याच रिलीज झालेल्या राजा नटवरलालमध्ये परेश रावल यांची भूमिका आहे.