दोन तरुणांच्या गटांमध्ये झालेले भांडण थांबवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेले पोलिस शिपाई जखमी झाले.
मुंबई – दोन तरुणांच्या गटांमध्ये झालेले भांडण थांबवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेले पोलिस शिपाई जखमी झाले. मालाडमध्ये शनिवारी ही घटना घडली. जखमी पोलिस शिपायाचे नाव मंगेश नाईक असे आहे.
मालाड येथील एस. व्ही. रोडवर लग्न समारंभात जेवण वाढण्याचे काम करणा-या दोन गटांत भांडण सुरू झाले. त्यातील एका गटातील तरुणाने त्याच विभागातील काही तरुणांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांच्यात पुन्हा भांडण सुरू झाले. कडाक्याचे भांडण सुरू झाल्यावर याबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्याच वेळेला गस्तीवर असलेले नाईक हे त्यांच्या सहका-यांसोबत घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी गेल्यावर एका तरुणाने फेकलेली वीट नाईक यांना लागली.