भाईंदर ते गोरेगाव दरम्यान बसक्रमांक ७०७ मध्ये एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुंबई – भाईंदर ते गोरेगाव दरम्यान बसक्रमांक ७०७ मध्ये एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. व्ही.के. सदानंद यांच्या छातीत दुखू लागल्याचे त्यांनी बसवाहकाला सांगितले. त्यानुसार बसवाहक वसंत बानखेडे यांनी सदानंद यांना बोरिवली येथील भगवती रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने सदानंद यांचे निधन झाले.