वेगवेगळे दोन रंगलेखक. त्यांचा भिन्न वयोगट. गावंही वेगवेगळी. तरीही एक साम्य या दोन चित्रकारांनी वेगवेगळ्या दोन कलादालनात मांडून ही दालने समृद्ध केली आहेत.
वेगवेगळे दोन रंगलेखक. त्यांचा भिन्न वयोगट. गावंही वेगवेगळी. तरीही एक साम्य या दोन चित्रकारांनी वेगवेगळ्या दोन कलादालनात मांडून ही दालने समृद्ध केली आहेत. जहांगीर कलादालनात लागलेल्या प्रदर्शनातून सुप्रसिद्ध सिनेनिर्माते-दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगलेखक प्रकाश भेंडे यांनी अजिंठा-एलोराची सफर त्यांच्या रंगलेखनातून घडवली आहे.
दुसरीकडे कोलकात्याचे तरुण चित्रकार असिफ हुसन यांनी भारतातल्या अनेक शहरातील ऐतिहासिक वास्तू कॅनव्हासवर रेखाटून हा ऐतिहासिक चित्ररूपी दस्तावेज या चित्र मालिकेच्या रूपाने कलारसिकांसमोर मांडला आहे. हे दोन्ही प्रदर्शने प्राचीन वैभवाची समृद्ध सफर घडवणारी आहेत.
सुप्रसिद्ध रंगलेखक तसेच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे त्यांनी वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण केले असून, त्यांच्या गतकाळातील आठवणींना उजाळा म्हणून त्यांनी गेल्या अनेक वर्षात विविध विषयांवर रेखाटलेल्या चित्रांचा संग्रह जहांगीर कलादालनात रसिकांसमोर ठेवला आहे.
‘भूत, वर्तमान आणि भविष्य’ या तिन्ही काळाशी नाते सांगणा-या चित्रकलाकृतीचे प्रदर्शन १ जुलैपासून सुरू झाले असून, ते ७ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. ‘भालू’, ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘चटक चांदनी’, ‘आपण यांना पाहिलंत का’, ‘आई थोर तुझे उपकार’ अशा चित्रपटांची निर्मिती करणारे निर्माते-दिग्दर्शक तसेच सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश भेंडे यांच्या रंगलेखनाने ‘पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर’ या शीर्षकांतर्गत जहांगीरचा ऑडिटोरियम हॉल समृद्ध झाला आहे.
अजिंठा व एलोरा येथील गुहेतील असणारी प्राचीन संस्कृतीदर्शक अशी अलौकिक शिल्पकला व तिची विविध रूपे यावर आधारित निर्मिलेली त्यांची ‘अनसेंट वॉल’ सीरिज रसिकांची नजरबंदी करणारी आहे. त्यातील ‘पद्मपाणी’, ‘वज्रपाणी’, ‘डिवाईन त्रिमूर्ती’, ‘अभिषेक’, ‘वैश्विक नर्तकी’, ‘मेलोडिअस ब्लेसिंग्स’, ‘स्पिरिच्युअल लाईफ’, ‘डिवाईन ब्युटी’, ‘माया’ आदी अनेक चित्रे अजिंठा-एलोरात घेऊन जाणारी आहेत.
‘सोलब्रिदिंग’ सीरिजमधील ‘ब्युटी इन द ब्लूम’, ‘ब्रिझ ऑफ जॉय’, ‘इन सर्च ऑफ पास्ट’, ‘सोल प्युरिटी’, ‘मेरीगोल्ड ब्युटी’ ही भावोत्कट व परिणामकारक चित्रे संवेदनाशील स्त्रीचे भावविश्व व त्यातील अनेक पैलू साकारणारी आहेत. ठळक व उत्तेजक, पण विषयास अनुरूप असे रंग व शक्तिशाली कुंचल्यातील विविध फटका-यातून कलात्मकतेने साकारलेल्या ‘एक्सप्लोर’ या सीरिजमधील त्यांची ‘अचिव्हमेंट’, ‘पॅराडाईस रेस’, ‘फाईव्ह स्टार रेस’, ‘स्विंग मूड’ ही चित्रे अनेक घोडे, त्यांची मानसिकता, शौर्य, वेग, शक्ती तसेच त्यांचे भावविश्व यथार्थतेने दर्शवितात.
त्यांनी निर्मिलेल्या अमूर्त शैलीतील ‘इन्फिनिटी अॅबस्ट्रॅक्ट’ सीरिजमधील ‘माइंड ब्लोईंग’, ‘टय़ून ऑफ इन्फिनिटी’, ‘मान्सून फ्लॉवर’, ‘होरीझोन’, ‘कॉस्मिक मिरॅकल’, ‘टायगर’, ‘लस्ट’ ही चित्रे आपल्या अप्रतिम रंगलेखनातून व कलात्मक अभिव्यक्तीत्वामुळे अनन्यसाधारण कलाविष्कारांचे दर्शन घडवणा-या आहेत.
विविधांगी आविष्कारांनी व त्यातील कलात्मक पैलूंनी नटलेली भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील ही कलारूपे प्रकाश भेंडे यांनी या प्रदर्शनात सादर करून कलारसिकांशी संवाद साधला आहे.
समकालीन कलाक्षेत्रे व सिनेजगतात प्रसिद्धी मिळवणारे व आपल्या विविधांगी कलाकृतींतून तसेच रसिकमान्य चित्रमाध्यमातून जनमानसात नावलौकिक मिळवणारे प्रकाश भेंडे मूळचे टेक्सटाईल डिझाईनर आहेत; पण कला सौंदर्यदृष्टी, तीव्र आकलनशक्ती या कलागुणांच्या बळावर विविध कलाविष्कारातून त्यांच्या अंगी असणा-या नपुण्याचे एक नयनरम्य व मनोहर सादरीकरण करून कलारसिकांची प्रशंसा कमावली आहे. त्यांचा मूळचा पिंड कलाकाराचा असल्याने निसर्ग प्रकृती, स्त्री सौंदर्य व तिचे विविध भावनिक पैलू, आपली संस्कृती व परंपरा वगरे ठळकपणे दर्शवणारी त्यांची मनोवेधक चित्रे तैलरंग व अॅक्रलिक रंगलेखनातून वास्तववादी, मूर्त, अमूर्त व निम्न वास्तववादी अशा अनेक पैलूंनी नटलेली आहेत.
कोलकाता येथील तरुण चित्रकार असिफ हुसन यांचे ‘ट्रॅडिशनल हेरिटेज ऑफ इंडिया’ हे चित्रप्रदर्शन खार (प.) येथील लिंकिंग रोडवरील पेंटेड ऱ्हिदम आर्ट गॅलरीत १ जुलैपासून सुरू झाले असून, ते ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
काळा, पांढरा आणि तपकिरी अॅक्रलिक रंगांच्या विविध छटांचा उपयोग करून असिफ हुसन यांनी ही बहारदार चित्रनिर्मिती केली आहे. रात्रीच्या वेळचे सोनेरी रंगात न्हाऊन निघालेले, मंत्रमुग्ध करणारी वाराणसी, गंगेचे घाट, पावसाळी कुंद वातावरणातला कोलकात्यामधला रस्ता, मुंबईची शान असलेले छत्रपती शिवाजी टर्मिनस अशासारख्या अनेक ठिकाणांना त्यांनी कॅनव्हासवर अजरामर करून ठेवले आहे.
दाट तपकिरी रंगांच्या अनेक छटा आणि निळ्या तसेच लाल रंगांचा संयत वापर यामुळे या चित्रांना एक प्राचीनत्व लाभले आहे. ग्रामोफोन, बनारस आणि इतर घाट, स्मारके यांचे पुरातन वैभव पाहताना दर्शकाला त्या काळात घेऊन जायची ताकद या चित्रांमध्ये आहे. कलारसिक मुंबईकरांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी.
असिफ हुसन यांनी कोलकात्याच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्टमध्ये आपले कलाशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भारतातल्या अनेक शहरांतील जीवन आपल्या कुंचल्याच्या साहाय्याने कॅनव्हासवर उतरवणारी एक चित्र मालिकाच त्यांनी उभी केली आहे. अॅक्रलिक रंगांच्या सहाय्याने चित्रित केलेल्या या कलाकृती कलारसिकांना नेत्रानंद देतील अशाच आहेत.