मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
मुंबई- मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. नीरज हातेकर यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत शनिवारी मध्यरात्री घेण्यात आला. हातेकर यांच्या निलंबनाच्या निर्णयासंदर्भात मुंबई विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेत तब्बल दहा तास चर्चा झाली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयासोबत हातेकर यांच्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई विद्यापीठाने माजी न्यायाधीश डी.जी. देशपांडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
समाजमनाचा आणि मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील विद्यापीठाच्या हिताचा विचार करून तुर्तास हे निलंबन मागे घेण्यात येत असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी नेमलेल्या एक सदस्यीय सत्यशोधन समितीने डॉ. हातेकर यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे उपस्थित केलेल्या १६ मुद्यांची माहिती सादर करण्यात आली यात हातेकर यांच्या मुद्यांचे अनेक पुराव्यानिधी खंडण करण्यात आले.
[poll id=”529″]
राज्यपाल डॉ. शंकरनारायणन यांनी गेल्या आठवडय़ात डॉ. हातेकर यांच्या प्रकरणाचा तात्काळ निकाल लावण्याचे आदेश मुंबई विद्यापीठाला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची ही बैठक घेण्यात आली होती. ही बैठक तब्बल १० तास चालली व ती सर्वात विक्रमी बैठक ठरली.
२० डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत डॉ. हातेकर यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा निर्णय घेतला होता. त्याचे पत्र चार जानेवारी दरम्यान हातेकरांना सोपविण्यात आले होते. त्यानंतर विद्यापीठात हातेकर यांच्या समर्थक विद्यार्थी आणि संघटनांकडून आंदोलने, निदर्शने करण्यात आली होती. यामुळे विद्यापीठात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हातेकर यांना समर्थन देण्यासाठी विविध विद्यार्थी संघटनांनी अनेक वेळा आंदोलने केली. यात प्राध्यापकसह काही राजकीय पक्ष संघटनांनीही उडी घेतली होती यामुळे विद्यापीठ परिसराला राजकीय आखाडय़ाचे स्वरूप आले होते. तर मुंबई विद्यापीठाचे आजी माजी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी घेतलेले डॉ. हातेकर यांच्या निलंबनाचा निर्णय योग्य असल्याचे सांगत वेळुकर यांचे समर्थनही केले होते.
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचे ठळक वैशिष्ठ्ये
» डॉ.नीरज हातेकर यांनी उपस्थित केलेले सर्व १६ मुद्यांचे पुराव्यानिशी खंडण
» २० डिसेंबर रोजी कुलगुरूंनी घेतलेला निर्णयावर कायद्यानुसार योग्यच
» निलंबनाच्या कारवाईचे सर्व सदस्यांनी ठामपणे समर्थन केले
» हातेकर यांची विभागीय चौकशी सुरू व्हावी
» नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने हातेकरांना बाजू मांडण्याची संधी देण्याची शिफारस