बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने तिचा प्रियकर जेन गुडइनफसोबत अमेरिकेत लग्न केल्याचे वृत्त आहे.
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने तिचा प्रियकर जेन गुडइनफसोबत अमेरिकेत लग्न केल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिती आणि जेन गुडइनफ यांचा विवाह लॉस एंजेलिसमध्ये पार पडला. प्रिती अमेरिका दौ-यावर असताना दोघांमध्ये ओळख झाली होती. जेन हा अमेरिकेतील फायनान्स सल्लागार आहे.
जेन आणि प्रितीचा विवाह २९ फेब्रुवारी रोजी अत्यंत साधेपणाने, जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत एका छोट्या खाजगी समारंभात पार पडल्याचे सांगण्यात येते. प्रितीची मैत्रीण सुजान खान या लग्नाला हजर असल्याचेही सांगण्यात येते.
विशेष म्हणजे प्रीती एप्रिलमध्ये भारतीय पारंपरिक पद्धतीने पुन्हा लग्न समारंभ साजरा करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी बॉलिवूडमधील सर्व मित्र, सेलिब्रिटी मंडळी उपस्थित राहणार आहेत.