फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यात आली.
पुणे- फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यात आली. तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणातील दोन जणांना अटक केली.
गुड्डू झाकीर व अमजद असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आंध्रप्रदेश आणि ओडिशा राज्याच्या सीमेवर ओडिशा पोलिसांनी गुड्डू व अमजद या दोघांना अटक केली असून या दोघांचाही फरासखाना स्फोट प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे.
सुमारे दीड वर्षांपुर्वी फरासखाना पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या स्प्लेंडर मोटारसायकलच्या डिकीत १० जुलै २०१४ रोजी दुपारच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात पाचजण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास पुणे एटीएस करीत आहे. हा स्फोट ज्या मोटारसायकलच्या डिकीत झाला ती मोटारसायकल चोरीची होती.
[EPSB]
पुण्यात बॉम्बस्फोट, तीन जखमी
पुण्यातील शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ असलेल्या फरासखाना पोलिस ठाण्याच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या स्प्लेंडर मोटारसायकलच्या डिकीत गुरुवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास एक सौम्य स्फोट झाला.
पुण्यातील बॉम्बस्फोटाचा तपास ‘एटीएस’कडे
फरासखाना पोलिस ठाण्याच्या पार्किंगमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला आहे.
[/EPSB]