बॉलिवुडचा सुपरस्टार शाहरुख खानने कॉलेज सोडल्यानंतर तब्बल २८ वर्षांनी दिल्लीच्या हंसराज महाविद्यालयामधून वाणिज्य शाखेची पदवी स्विकारली.
नवी दिल्ली- बॉलिवुडचा सुपरस्टार शाहरुख खानने कॉलेज सोडल्यानंतर तब्बल २८ वर्षांनी दिल्लीच्या हंसराज महाविद्यालयामधून वाणिज्य शाखेची पदवी स्विकारली. हंसराज महाविद्यालयाचे मुख्याध्यापक रामा शर्मा यांनी शाहरुखला ही पदवी प्रदान केली.
फोटो पहाण्यासाठी येथे क्लिक करा
हंसराज महाविद्यालयातून शाहरुखने १९८८ मध्ये अर्थशास्त्र शाखेचे शिक्षण पूर्ण केले होते. ही पदवी घेतल्यानंतर शाहरुखने हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. आज मी माझ्या महाविद्यालयाच्या जीवनात परतलो, असे तो म्हणाला.
शाहरुखने यावेळी ‘फॅन’ या आगामी चित्रपटाचे पहिले गाणे प्रसिद्ध केले. शाहरुखने ट्वीटवरूनही महाविद्यालयात जमलेल्या त्याच्या चाहत्यांचे आभार मानले.
What a beautiful day thank you university mates & faculty. Love to all for such a memorable emotional moment. pic.twitter.com/bNaQQLJmCn
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 16, 2016
Fan took me to Delhi my younger days and today to my college. Thank you yrf and Maneesh. JABRA mazaa aayaa. pic.twitter.com/o4yzsWIwNI
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 16, 2016