गुगलने रविवारी ‘फादर्स डे’च्या निमित्ताने जगभरातील पित्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन केले.
कॅलिफोर्निया (अमेरिका)- गुगलने रविवारी ‘फादर्स डे’च्या निमित्ताने जगभरातील पित्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन केले. गुगलने आपल्या वेबसाईटवर ‘फादर्स डे’ निमित्त खास डूडल तयार केले होते. यात वडील व मुलाचे नाते किती घट्ट असते, हे दाखवण्यात आले.
काही सेकंदाच्या या चलचित्र स्वरूपातील डुडलमध्ये फक्त मानव नव्हे, तर प्राण्यांमध्येही पित्याला त्याच्या अपत्याबद्दल किती प्रेम, जिव्हाळा आणि काळजी असते हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
दिवसभरात जगातील कोटय़ावधी लोक गुगलला भेट देत असतात. त्यात रविवारी गुगलने तयार केलेले हे विशेष ‘डूडल’ पाहून अनेकांना सुखद धक्का बसला.
कुठल्याही विशेष दिनी अथवा एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्यासाठी गुगल नेहमीच अशाप्रकारचे ‘डूडल’ तयार करत असते. या डूडल्सला नेटीझन्सची मोठी पसंती मिळत असते. रविवारच्या ‘फादर्स डे’च्या डूडललाही अनेकांनी पसंती दर्शविली.