फादर्स डेच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता सलमान खाननेही आपल्या वडिलांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई – फादर्स डेच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता सलमान खाननेही आपल्या वडिलांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या वडिलांबरोबरचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.
सलमान खानने आपले वडिल आणि आपला भाऊ अरबाज खानसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
‘सलीम खान (डूल्लू) उर्फ प्रिंस सलीम हे खरे बजरंग भाईजान आहेत, हॅपी फादर्स डे डॅड’ असे सलमानने ट्विट केले आहे.
सलमान खानबरोबरच त्याची बहिण अर्पिता आणि अरबाज खानने ही पिता सलीम खान यांना फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
My dad strongest. Salim khan(dullu) urff prince Saleem the original bajrangi bhaijaan, happy father's day daddy.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 21, 2015