बिपाशा बासू गेल्या काही दिवसांत अस्वस्थ आहे, असं म्हटलं जातंय. कारण या दिवसांत तिने केलेल्या कामांचा विचार करून तिच्यावर काही प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे.
बिपाशा बासू गेल्या काही दिवसांत अस्वस्थ आहे, असं म्हटलं जातंय. कारण या दिवसांत तिने केलेल्या कामांचा विचार करून तिच्यावर काही प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे. हॉट सीन्स आणि ग्लॅमरला घेऊन नेहमी चर्चेत असणारी बिपाशा आता ऑफ बीट चित्रपटांतसुद्धा काम करणार आहे.
बिपाशा असं म्हणते की, मी आता बांगलामधील चित्रपट करणार आहे. आणि ती लवकरच क्रिएचर थ्रीडी चित्रपटात पाकिस्तानी कलाकार इमरान अब्बास नक्वी सोबत पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर विक्रम भट्ट यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. २००९ मध्ये डायरेक्टर रितुपर्णो घोषच्या ‘सब चरित्र काल्पनिक’ या चित्रपटात बिपाशाने भूमिका केली होती.
या संदर्भात बिपाशा असं म्हणते की, ‘मी पुन्हा बांगला चित्रपटांपटात काम करण्यास इच्छुक आहे. कमर्शिअल चित्रपटांसोबतच ऑफ बीट सिनेमांमध्येही काम करण्याची सवय लावून घेणार आहे.