भ्रष्टाचारमुक्त भारत बनवण्याची स्वप्न दाखवून नेहमीच काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे आरोप करणा-या भाजपचे पितळ उघडे पडले आहे.
मुंबई- लोकसभा निवडणुकीदरम्यान मुझ्झफरनगरमध्ये चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर आम आदमी पक्षाच्या आमदाराला फोडण्याचे प्रयत्न करत असल्याच्या स्टिंग ऑपरेशनची सीडी आपने बुधवारी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांना सोपवली. त्यातच गेल्या सहा महिन्यांत मुंबई महापालिकेतील भाजपच्या दोन नगरसेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
मुंबईत भाजपचे दोन नगरसेवक भ्रष्टाचाराच्या गाळात
भ्रष्टाचारमुक्त भारत बनवण्याची स्वप्न दाखवून नेहमीच काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे आरोप करणा-या भाजपचे पितळ उघडे पडले आहे. गेल्या सहा महिन्यांत मुंबई महापालिकेतील भाजपच्या दोन नगरसेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी लाच घेताना रंगेहात पकडले आहे. स्वच्छ प्रतिमेचा बुरखा चढवणा-या भाजपचा खरा चेहरा आता उघड झाला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भ्रष्टाचारमुक्त आणि सुशासन दिले जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी देत आहेत. परंतु मोदी सरकार आल्यानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेची स्वप्ने पाहणा-या भाजपने विधानसभेच्या तयारीसाठी ब्लॅकमेलिंग करत लुटमारी करण्यास सुरुवात केली. महापालिकेत शिवसेनेसोबत सत्ता उपभोगणा-या भाजपकडे विधी व महसूल समिती आल्यापासून त्यांनी जकातचोरीवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जकात चुकविणा-या गाडय़ा पकडून त्यांच्याकडून वसुलीबाजी करण्यातच धन्यता भाजपच्या नगरसेवकांनी मानली आहे.
भाजपचे अध्यक्ष अमित शहांविरोधात आरोपपत्र
आपने स्टिंग ऑपरेशनची सीडी राज्यपालांना सोपवली
मंगळवारी जकात चुकवून येणारी गाडी पकडून न देण्याच्या बोलीवर दोन लाख रुपयांची खंडणी भाजपचे नगरसेवक तथा विधी व महसूल समितीचे अध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांनी मागितली. त्यांच्यासह त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाला एक लाख रुपये स्वीकारताना पकडले. परंतु शर्मा यांनी तेथून पलायन केले. पण त्यांची तीन माणसे एसीबीच्या गळाला लागली असून मोबाइल फोनवरील संभाषणावरून त्यांचा यात सहभाग होता हे उघड झाले.
भाजपचे ज्ञानमूर्ती हे महापालिकेच्या विधी व महसूल विभागाचे अध्यक्ष असून त्यांनाच लाचखोरीत अटक झाल्यामुळे पालिकेचे नाक कापले गेले. मात्र, यामुळे भाजप शिवसेनेबरोबरच पालिकेची तिजोरी लुटतानाच तिजोरीत येणारा पैसाही परस्पर लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचेही उघड झाले. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी अँटॉप हिल येथील भाजपचे नगरसेवक महंत चौबे यांनाही २५ हजारांची रक्कम स्वीकारताना अटक झाली होती. त्यामुळे भाजपचे नगरसेवक हे लाचखोरी आणि खंडणीखोरीत गुंतल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मोदींच्या भाजपचे भ्रष्टाचार हेच ध्येय आहे का असा सवालही उपस्थित केला जात आहे.
[EPSB]
भाजपचे अध्यक्ष अमित शहांविरोधात आरोपपत्र
लोकसभा निवडणुकीदरम्यान मुझ्झफरनगरमध्ये चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
आपने स्टिंग ऑपरेशनची सीडी राज्यपालांना सोपवली
आम आदमी पक्षाच्या आमदाराला फोडण्याचे प्रयत्न करत असल्याच्या स्टिंग ऑपरेशनची सीडी आपने बुधवारी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांना सोपवली.
[/EPSB]